Saturday, December 26, 2009

आज मागे वळून बघतो, तू दिसतेस जाताना...

आज मागे वळून बघतो, तू दिसतेस जाताना,
मी मात्र हताश उभा, डोळे भरून पाहताना...

शब्दच नव्हते जणू,तुझ्याशी शेवटच बोलताना
गहिवरून नुसत आल होत, तुझ्यासोबत चालताना

आज मात्र मी त्यातून, पूर्णपणे बाहेर पडलोय
तुझ्या त्या आठवनिंशी, जीवानिशी लढलोय

एखाद्याला कसे सहज टाळावे, हे तुझ्याकडून शिकलोय,
तुला विसरता विसरता, मी सार सुख मुकलोय

कठोर तुझ मन, मी माझ्यातही साकारलाय,
कित्येकवेळा माझ सुख, मी स्वताच नाकारलंय

भावनेचा बोजारा उडालाय , अन so called professional झालोय ,
हसत खेळत राहतोय खर , पण मनातून कित्येकदा मेलोय

आभार तुझे मनापासून, तू माझ्या जीवनात आलीस(?),
प्रेम वगैरे काही नसत, झकास पैकी सांगून गेलीस,

भावनांचा खून, अन प्रेमाची राख झालीये,
माझी ती Life केव्हाच , अश्रून्सोबत वाहून गेलीये ...

-- सचीन.

Wednesday, November 4, 2009

तीच्या लग्नाचे निमंत्रण...

तीच्या लग्नाची पत्रिका आज घरी दीसली
थरथरत्या हातानी त्यावरची आसव पुसली

एक आसू नेमका तीच्या नावावरच पडला
नाव ख़राब होइल म्हणुन पुसनारा हात अडला

दोन चार थेम्ब तीच्या बापाच्या नावावरही पडली,
ज्याकडे पदर पसरवून ती माझ्यासाठी रडली

एक थेम्ब पडला तिथे, जीथे आप्तांची नावे दाटली होती,
मजसोबत फीरताना तीला यांचीच भीती वाटली होती..

काही घसरलेली आसव , लग्न स्थळ दर्शवत होती,
आमच्या भेटीची एक एक जागा, मनात दाटवत होती

'आहेर आणु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्यासाठी मी तर आत्माही, गमावला होता

एक थेम्ब ओघळुन, तारखेवर स्थीरावला होता,
काळीज तुटताना पाहण्यास, तो जणू सरावला होता

अगत्याचे निमंत्रण ते, शुभाशीर्वाद देण्यास धाडले होते,
छोट्याशा त्या कागदाने, हृदय माझे तोडले होते

-- सचीन.

Wednesday, October 14, 2009

देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय

देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय
कुणालाबी कशाचीच परवाच राहिली नाय

फ्रेंडशिप अस म्हणुन काहीतरी करतात,
२ दिवस मनापासून गप्पाबी मारत्यात,
तीसर्या दिवशी बोलायला टाइमच नाय
देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय

नंतर मग पटल नाही की भांडण होतात
कधीबी न भेटलेली, मन दोष देतात
चुकल कोनाच कुठ, याचा पत्त्याच नाय
देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय

पोरिंच तर माला काही विचारूच नकू,
तू बी त्यांच्या भानगडीत डोकावू नकू,
त्यांच्याशी मैत्री, म्हणजे मन स्वतालाच खाय
देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय

कास रे देवा, ही अशीच होती का नाती
मनातल्या गोष्टी सार्या मनातच राहती,
४ दीस बोलण, अन कायमच बाय
देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय
देवा रे देवा, हे आजकाल घडतय काय

-- सचीन.

Friday, September 11, 2009

दिशाहीन जगलो मी, तुला सार श्रेय होत

सोन्याच्या लंकेतही, जळत माझ खेड होत...
निर्व्याज माझ प्रेम, सर्वच काही वेड होत...

व्यक्त कसं करावं हे सगळ्यात मोठं कोडं होतं
आणि मी कितीही व्यक्त केलं तरी तुझ्यासाठी ते थोडं होतं...

तू उभी असतानाही , जाण माझ नक्की होत
जीव जडला होता , अन मन हे दुखी होत

अडखळत माझ चालण, तुझ मात्र ध्येय होत
दिशाहीन जगलो मी, तुला सार श्रेय होत

Tuesday, September 8, 2009

जिच्यात तू नेहमी तीलाच शोधल आहे ...

खुप दिवस झाले त्याला
पहिल्यांदा गाडी चालवत होतो
आनंद खुप झाला होता
म्हणुन वेगानेच वळवत होतो

मग काय.. पडलो जोरात,
जखम झाली अंगाला,
खुप दुखायला लागले,
कोणीच येइना मदतीला

एकटाच बसलो काही वेळ
तशीच जखम दाबुन धरली,
वेदना फार होत होती,
काही वेळाने ती विरली

वाटू लागले मनाला,
आता जखम बरी झाली
उठलो जसा चालायला,
डोळ्याशी अंधारी आली

दीवसामागुन दीवस गेले
जखम मात्र सलत राहीली
जड़ झाले अंग सारे,
नजर अश्रु गाळत राहीली

दरवेळी जखमेवर एक
नवीन खपली यायची,
जखम माझी बरी होइल,
आशा मनी निर्माण व्हायची
...
खपली नेहमी मग मी,
मनापासून जपायचो,
माझ्यासाठी तीच अस्तित्व,
मनोमन तिचे आभार मानायचो

जास्तच काळजी घेतली ना की,
खपलीही मग निघून जायची,
तिची घेतलेली अती काळजी
तीला नाहक दखल वाटायची

पुन्हा एकदा जखम नव्याने
पूर्वीसारखी ताजी व्हायची,
पुन्हा एकदा त्रास नव्याने
मला वाढवून द्यायची..

देवाकडे पाहील अन विचारल
देवा, जखम का रे बरी होइना,
बघ ही अवस्था माझी,
धड चालताही येईना

देव म्हणाला, जखम ही तीच रे
जीने तुला कधीच सोडल आहे,
अन खपली ती नवी मैत्रीण,
जिच्यात तू नेहमी तीलाच शोधल आहे

Tuesday, August 25, 2009

तू....

तू , अगदी जवळची,
हवीहवीशी वाटणारी ,
तू, वटवृक्ष जशी,
मायेची सावली दाटणारी ..१

तू , कधी पर्जन्य वृष्टी ,
प्रेमाचा वर्षाव करणारी ,
तू, कधी अथांग सृष्टी ,
मला सामवुन धरणारी..२

तू कधी मायेची लेक,
हळूच कुशीत रडणारी ,
तू, कधी मंद झुळुक,
हळूच हृदय छेडणारी..३

तू कधी माझी छाया,
मजसोबत सतत चालणारी ,
तू, कधी माझी स्मृती ,
सतत माझ्याशी बोलणारी..४

तू कधी माझी हाक,
कानात सतत गूंजणारी ,
तू, कधी माझी धाप ,
जीवावर हक्क सांगणारी..५

तू कधी माझी दृष्टी,
फ़क्त तुलाच पाहणारी,
तू, कधी सरीता जशी ,
दिनरात मजसाठी वाहणारी..६

Thursday, July 2, 2009

मी हरलेला , व्यर्थ ठरलेला ..

मी हरलेला , व्यर्थ ठरलेला

ध्येय माझे शोधता,
दीशाहून चालून थकलेला,
पाउस पहिला अनुभवता,
चिखल माथी माखलेला
मी हरलेला , व्यर्थ ठरलेला ..

आयुष्याच्या हळुवार क्षणी
अनपेक्षीतपणे वागलेला,
अवीश्वासाच्या दुनीयेतही,
व्रतस्थपणे जागलेला
मी हरलेला , व्यर्थ ठरलेला ..

not complete yet ...

Thursday, May 21, 2009

मैत्रीण

तू गेलीस सोडून
जाते म्हणुन बोलली नाहीस
तुझ्या पच्छात जगतोय कस,
पाहण्यास मागेही फीरली नाहीस

मैत्रीण म्हणुन तुला मी
नेहमीच MISS करतो
तुझ्यासारखी मैत्रीण असावी,
नेहमीच आशा करतो

नविन मैत्रीमध्ये न जाने
अपेक्षाच खुप ठेवल्या जातात,
तुझ्या सवयी जशाच्या तशा,
नव्या मैत्रीनीकडे पाहिल्या जातात

पण कधीतरी उगाचच,
माझाच भ्रमनिरास होतो ,
तुझ्यासारखी तूच होतीस,
पुन्हा एकदा विश्वास होतो

पण खर सांगू तुला आता,
खुप छान मैत्रीण भेटली आहे,
अन प्रेम माझे तूच असले तरी,
मैत्रीची जागा तीने घेतली आहे

Thursday, April 16, 2009

पुन्हा एकदा...

पुन्हा एकदा आभाळ
गच्च भरून आलय
त्याच्या गडद काळोखात
सार अंधारून गेलय

पुन्हा एकदा मनाला ..
तीच भयान शांतता जानवतेय,
माझ्याशिवाय कोण तुझे
हेच जणू खुणावतेय

पुन्हा एकदा पानांची,
सळसळ ऐकु येतेय,
अंगावरील प्रत्येक लव,
अगदी शहारून जातेय

पुन्हा एकदा नेहमीसारखा
तोच पाउस आठवतोय,
चिम्ब चिम्ब भिजताना,
तुझा सहवास भीनवतोय...

पुन्हा एकदा मनी तीच
जुनी कळ्कळ येतेय,
आठवनीत तुझ्या पुन्हा
आयुष्य जळजळ होतय !!!

Monday, April 13, 2009

कवी नको चित्रकार व्हावे,विचार मनात गहीरा होतो...!

कवीतांसाठी आज काल
वेळच मिळत नाही मला,
एवढ छोटस कारणही,
सांगाव लागत तुला.?

बरयाच दिवस कविता नाही,
हे पाहून लटकेच रागवतेस, 
रुसवे तुझे रूप पाहता 
नजरेची तहान भागवतेस...  

कस समजावू तुला की, 
कविता अशी बनत नाही,
योग्य वेळ आल्याशिवाय,
कोळीही जाळे विनत नाही

दरवेळी कविता करू म्हणतो,
समोर तुझा चेहरा येतो,
कवी नको, चित्रकार व्हावे,
विचार मनात गहीरा होतो...!

Friday, January 16, 2009

अन तोच असेल खरा, भारत मातेचा विजय !!!


भारत माता की जय
असा जयघोष कानी आला
आठवून त्या स्वातंत्र्य स्मृती,
देशाभीमान जागा झाला

प्रजासत्ताक दिवस आहे आज 
हे कैलेंडर मध्ये पाहून कळले
माझे पाय मग आपोआपच, 
त्या झेंडावंदन समारंभाकडे वळले

झेंडावंदन कार्यक्रम अटोपला
त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झाले, 
स्वातंत्र्यासाठी जीवन अर्पण केले
त्याना आठवून डोळ्यात पाणी आले

यानंतर जमलेल्या नेते मंडळींनी
सुरु केली, भाषणांची मैफील 
त्यांचे भाषण ऐकताना वाटले 
यांच्यामुळेच आहे का सारे लोक गाफील

देशावीषयीच बोलण राहील बाजुला
यानी सुरु केल आश्वासन देण,
किमान आज तरी देशाचे पाईक व्हा,
सगळ्या जनतेच मनोमन हे मागण 

भाषण झाल की संयोजक आले
अन कार्यक्रम संपल्याच घोषीत केल,
अन फ़क्त झेंडावंदन केल म्हणजे,
देशावीषयी आपल कर्तव्य का झाल ???

मग मी विचार करू लागलो
मागच्या ६०वर्षात,आपण मिळवलय काय ???
कुणाकुणाला पिझ्झाची सवय,
तर अजुनही कोणाला खायला भाकरी नाय !

पाष्चीमात्य संस्क्रृतीला आदर्श मानतो,
पण वाढत्या महागाईचा विचार, करतोय कोण ?
समोरा समोर भेटायला वेळ मीळेना,
पण कानाला तासंतास,दीसतोय CELL फ़ोन

याला प्रगती मी म्हणेल तर,
माझीच मला येइल कीव,  
स्वातंत्र्याचे मोल संभाळुन,
बलिदानांची असावी जाणीव  

जन माणसात होइल जेव्हा बंधुभाव,
अन कोणालाच नसेल उपासमारीचे भय,
तेव्हा खरया अर्थाने स्वतंत्र होऊ,
अन तोच असेल खरा, भारत मातेचा विजय !!!

Wednesday, January 14, 2009

बस झाल यार आता, किती सेंटी कविता करू?

बस झाल यार आता
किती सेंटी कविता करू?
अन त्या बावळट प्रेमापायी
एकटाच मी किती काळ झुरु??

प्रेम वगैरे काही नाही
सगळे मनाचे खेळ असतात
कितीही उत्कट इच्छा असताना
काहिंचेच तीथे मेळ बसतात

इतर प्रेमवीर मात्र उगाचच
या जंजाळात फसतात,
नयन रम्य देखावेही याना
मग रुक्ष रुक्ष भासतात

प्रेम वगैरे म्हटल की
मुलींचे नखरेच फार असतात,
प्रेमासाठी वेडे झालेले
इथे फ़क्त मुलेच दिसतात

तेव्हा मृगजलाच्या पाठीमागे धावण्यात
वेळ उगाच घालवू नका,
अन जो प्रेम देइल तुम्हाला
त्यालाच प्रेम द्यायला शिका!

Tuesday, January 13, 2009

तुला पहायची खुप इच्छा होतेय

तुला पहायची खुप इच्छा होतेय,
एकदाच मला भेटतेस का?
डोळ्यात साठवून घेऊ दे आयुष्यभ्ररासाठी
एवढच मजसाठी करतेस का?

बरच काही बोलायच आहे ,
थोडासा वेळ, देतेस का?
निरोप अखेरचा घेताना
एकदाच माझ्याकडे, पहातेस का ???

बघ एकदा प्रेमाच्या नजरेने,
माझ काही चुकल ,वाटतय का?
मैत्रीचे ते क्षण आठवता,
मनात तुझ्या दुःख, दाटतय का ?


मला सोडून मिळवलेल सुख,
तुला आता, मानवतय का?
चुकच झाली मैत्री तोडून
किमान आता तुला, जानवतय का ??

तुझी मला खुप आठवण येते म्हणत
तुझा न भेटण्याचा निश्चय, सूटतोय का?
कधी तरी माझाच म्हनवलेला आत्मा
आज तरी मजसाठी, तूटतोय का?

Friday, January 9, 2009

मन वीरहाच्या धुंदीत होत...

तू समोर होतीस तेव्हा मला,
बरच काही बोलायच होत,
शब्द त्याला शोधेपर्यंत
थोडस तू थांबायच होत

लिहायला घेतल तुझ्यासाठी
कवीतेतुन सगळ मांडायच होत
जेवढ़ होत प्रेम मनात
जणू कागदावर सांडायच होत

का माझ्याशी अशी वागलीस???
वीचारून तुला, भांडायच होत,
आपल्यात झाल ते आठवुन
मनमोकळे पणाने रडायच होत

बरच काही मनात असताना
औरच काही नशीबात होत
तुझ्याशिवाय जगण म्हणजे
दुःख माझ नीर्वीवाद होत

जेव्हा दूर चालली होतीस
तेव्हा मनात संगीत होत
थांब तुला म्हनाव तर
मन वीरहाच्या धुंदीत होत

Monday, January 5, 2009

केव्हा तरी.........

केव्हा तरी पहाटे, अचानक जाग येते
स्वप्नातल्या सत्याला, मन हे साद देते

केव्हा तरी मलाही, रम्य सकाळ आठवते,
पक्ष्यांचा कीलकीलाट मन हे दाटवते

केव्हा तरी दुपारची हळूच चाहुल लागते
लाही होता अंगाची , जणू तुझी छाया मागते

केव्हा तरी दीवसा ढवळया अंधारून येते
तुझ्या रुसव्या गीतांनी, गांगरुण जाते

केव्हा तरी दिवस मग मावळतीला कलतो
त्याला तसे पाहता जीव जणू टांगणीला लागतो

केव्हा तरी सूर्य जेव्हा मजसमोर लुप्त होतो
त्याच्या अस्तित्वाच्या शोधात, मी रात्रभर जागतो

केव्हा तरी फिरून पुन्हा तशीच पहाट येते
अन दिवसामागून दीवसाची अशीच लाट जाते

नव्या लाटांना सामोरे जाताना,डोळे मी भीजवतो
मागच्या काही लाटा पाहता, स्वतालाच डुबवतो