Tuesday, November 18, 2008

जगुन काय केल याच उत्तर बरेचदा मेल्यावरही मीळत नाही

तू दिलेली सारी वचने
तू कधीच पाळत नाही
अन याना खरच का वचने म्हणावे
हेच मला कळत नाही

अशा प्रेमाला म्हनाव काय
जिथे नातच कधी जुळत नाही
तुझ्या माझ्या नात्याच उत्तर
मला कधीच मिळत नाही

मेल्यावर काय होत
हे मेल्याशीवाय कळत नाही
पण जगुन काय केल याच उत्तर
बरेचदा मेल्यावरही मीळत नाही

Friday, November 7, 2008

होऊ दे आठवणीही माझ्या धूसर

मित्रांच्या गराड्यात असुनही
जेव्हा मी एकटा पडतो ,
तुझ्या आठवणीत जीव माझा
कठोर वेदनेने तड्फडतो

वेदनाही अशा ज्याला
कसल्याच वेदनेची तोड नाही
तुझ्या सोबतच्या क्षणांना
कुठल्याच सुखाची जोड़ नाही

तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण
मी प्राणपणाने जपला आहे
तू कशीही वागलीस माझ्याशी तरीही
याच क्षणांणमध्ये माझा आत्मा गुंतला आहे

तुला जसे जमेल तसे नाते तू जप
नाहीच जमले तर सगलच विसर
जिथे तुला ओढच ना राहीली माझी
तिथे होऊ दे आठवणीही माझ्या धूसर

Tuesday, August 5, 2008

तुझ्याच प्रेमसागरात एकरूप होऊदे मला...

सौंंदर्य सखे तुझ
मला नेहमीच आवडत
साधेपणातही सुंदर दीसन
हे अस कस घडत ??

पायातले पैंजण तुझ्या
सुरैल तालावर नाचतात..
माझ्या पावलांना मग
त्याचे गुज ऎकू येतात ...

गालावरची खळी तुझ्या
कोड्यातच टाकते मला...
जस अलगद उमलणन तुझं
ं माझ्या नाजूक फुला

काळेभोर केस तुझे
त्याना उपमा मी कशाची देऊ
तुझ्या मनाचेच प्रतीबीम्ब जसे
सरळ, शालीन अन मऊ

चेहरयावरी उडती तुषार ..
तव अंग चोरूनी घेतेस ..
वर्षाविहारात मात्र ..
चिंब ओली होऊन भिजतेस ...

रागवनं तुला अजिबात जमत नाही.
स्वार्थाला तर कुठे थाराच देत नाही..
सदा मदतीसाठी हात सरसावतेस..
दुबळ्यांना आधार एवढेच परम मानतेस..

ओठ पहाता सखे तुझे
बेधुंद मन माझे होते
तुझे माझे अनेक जन्माचे
व्हावे असे नाते

तु लाजताना मात्र
फक्त तुझ्याकडे बघणं होतं
तुझं ते मोहकं रुप पाहून
फक्त तुलाचं बघण्याच वेड लागतं..

एवढं सारं आहे तुझ्याकडे..
तरीही तुझे नयन काय शोधतात..
तुझ्याच प्रेमात पडलोय मी
असे सारे शब्द माझे मलाच ऐकू येतात..

आज मी तुला आवर्जून
माझ्या अंतकरणातला सांगत आहे..
माझ्या प्रेमाचं निवेदन
गुडघे टेकवून मांडत आहे..

आता तरी होकार दे ,
आणि काय हवयं मला?
येऊदेत प्रेमाची लाट..
अन तुझ्याच प्रेमसागरात एकरूप होऊदे मला...

Tuesday, July 8, 2008

ती सोडून गेली म्हणुन,किती दुक्ख करणार?

ती सोडून गेली म्हणुन,
किती दुक्ख करणार?
तिच्या प्रत्येक आठवणीन्मध्ये,
किती काळ झुरणार?
येते जेव्हा नवी पहाट..
नव्या सूर्या संगत..
उजलून निघा किरनानसारखे ..
पहा फुलांची रंगत..
केलेले प्रेम नकाच विसरू..
जपून ठेवा तिच्या सगळ्या स्मृति,
राखेतून घ्या ओजस्वी भरारी..
बघा मग आकाशाची उंची किती..
खर प्रेम नाही शिकवत,
आयुष्याचा वेग थाम्बवायला,
आपल्या ख़ास व्यक्तिपायी
इतर नाती लाम्बवायला..
प्रेम देत जिद्द नवी,
तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी,
हृदयाची सगळी वादळ झेलत,
यश मिळवायला लढण्यासाठी..
गाठा अशी क्षितिजे नवी..
की तिलाही तुमचा वाटेल गर्व..
मित्रानो, आता स्वतःसाठी
सुरु करा आयुष्याचे नवे पर्व..

संपलच नव्हत काही तर..

संपलच नव्हत काही तर..
दूर का गेलो होतो?
श्वास चालू ठेवन्या साठी..
रोज का मेलो होतो?
ओल्या चिम्ब आठवणीना
शेवाल हे लागणारच ना?
मनामध्ये रुतलेली हुरहुर ..
डोळे कधीतरी सांगणारच ना?
सावरलेल एक आयुष्य..
पुन्हा का ढवालयच?
करपलेल जुन मन..
पुन्हा किती जलवायच?
रस्ता आता नेहमिचाच..
पायवाट मात्र धावत आहे..
डवरलेला एक पारिजातक..
वाट तुझीच पाहत आहे..
नकोच येउस पुन्हा वलुन ..
मी तिथे असणार नाही..
मृगजला पाठी भुललेल मन..
पुन्हा कधी फसणार नाही..

Thursday, June 5, 2008

मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

का मी तुला देवाकडे पुन्हा मागतो आहे ?
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

मलाही कळतय आता
तुला नकोसा झालाय माझा सहवास
अन मला एकट सोडून
तू सुरु केलाय जीवनाचा प्रवास
या प्रवासात तुझ्यासंगे येण्याचे मीही स्वप्न पहातो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

खुप वीश्वास होता तुझ्यावर
अन तेवढेच प्रेमही केले
तू मात्र काहीच वीचार न करता
मला तुजपासुन दूर केले
तुझ्या परतण्याची वाट , मी अजूनही बघतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

आता कस सांगू तुला
हे प्रेम म्हणजे काय असत
यात वीरहाचे दुःख पचवण
वाटत तेवढ सोप नसत
प्रत्येक श्वासागणीक मी अधीकाधीक प्रेम करतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

तुझा तो नकार ऐकुन
रस्त्याकाठचा दीवाही बंद झाला
तू गेल्यानंतर मला तो बोलला
तुझ्या शब्दांचा स्पर्श त्याच्याही ह्रुद्यास झाला
प्रत्येक क्षण जगताना, अजूनही मी तीळतीळ मरतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

Monday, June 2, 2008

यालाच खरे जगणे म्ह्णु

सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
एकदा पालवी फुटली
त्याचे त्यालाच कळेना
जगन्याची ही जीद्द कुठली

जगुनही काय होते
शेवटी जळनेच नशीबी होते
तरीही जगावेच आपण
असे त्याला नेहमी वाटत होते

पालवी त्याची नाजुक
ती का कोणाला सावली देणार होती?
त्याची वेड्याची मात्र
अशीच काहीशी आशा होती

आता त्याला कोणी सांगाव
जीवन तुझ एवढ्यापुरतच आहे
अन आज पालवी फुटली तरी
उद्या तुझे मरण नीश्चीतच आहे

तरीही काय ती जीद्द
त्यालाही जगुनच दाखवायचे आहे जणू
खर्च ओंडक्याचे ते आयुष्य
यालाच खरे जगणे म्ह्णु

Monday, May 12, 2008

तू प्रेम माझे कधीच जानले नाही

क्षण- क्षणाला तुझी आठवन येते
अन मन माझे पार हेलावुन जाते
खर्च वीसराव म्हणतो तुला आता
पण प्रेम माझे अजुनच वाढत जाते

वाटल नव्हत कधी मला
जगताना एवढा संघर्ष करावा लागेल
एखाद्याला वीसरन्यासाठी
स्वताचा आत्माच गमवावा लागेल


अपेक्षा अशी केलीच कशी
जी तुला कधी मान्य झाली नाही
तुझ्या प्रेमाच्या दुनीयेत
मला जागा कधी मीळाली नाही

तुझ्याशी जेव्हा फ़क्त मैत्री होती
जीवन कस एकदम ख़ास होत
तीच मैत्री प्रेम भंगात बदलली
अन जीवन तेव्हा माझ राख होत

मीत्र म्हनून तुला मी
मनापासून आवडत होतो
आयुष्यभर फ़क्त माझीच रहा
एवढे मागने मागत होतो

माझ्या प्रेमाचा स्वीकार
करू शकली नाहीस हे मला समजले
पण तुझ्या आयश्यातुनच मला
कध्न्यास मन कसे तुझे धजले??


आता नाही पण आयुष्यात
कधीतरी तुला माझ्या प्रेमाची कीम्मत कळेल
कीतीही आवरलस स्वताला तरीही
माझ्यासाठी डोल्यातुन अश्रु गळेल

तेव्हा मनाला लावून घेऊ नकोस
मी तुला कधीच परके मानले नाही
वाईट फ़क्त एवढेच वाटते मला
तू प्रेम माझे कधीच जानले नाही

Thursday, April 10, 2008

वाटल नव्हत मला, अस काही घडेल,

वाटल नव्हत मला, अस काही घडेल,
आपल्या मैत्रीचा वृक्ष, असा कोलमडून पडेल..

याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता,
त्या दीवसात रोजच , दीवाली अन पाड़वा होता

जेव्हा रडत होतो , तेव्हा मैत्रीनच हसवल ,
जेव्हा हसायला शीकलो, तेव्हा मैत्रीनच रडवल,

चुक तुज़ीही नसावी, अन चुक माजीही नसावी ,
काय सांगाव, आपल्या दैवातच खोट असावी,

कारनाशीवाय दुरावलो याचच वाईट वाटत,
रडून रडून शेवटी , डोल्यातल पाणी आटत

वीसरूण सार दुःख , मी मनाला हव आवरायला ,
तू परत येशील समजून तयार आहे मी सावरायला

तू परतेपर्यंत मी तुझीच वाट पाहीन,
आताच काय , आजन्म तुझाच मीत्र राहीन,

जपून पावल टाकत जा, चुकुनही घसरू नकोस,
आठवण नाही काढलीस, तरी मला वीसरू नकोस

वाटल नव्हत मला, अस काही घडेल,
आपल्या मैत्रीचा वृक्ष, असा कोलमडून पडेल..