Monday, June 2, 2008

यालाच खरे जगणे म्ह्णु

सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
एकदा पालवी फुटली
त्याचे त्यालाच कळेना
जगन्याची ही जीद्द कुठली

जगुनही काय होते
शेवटी जळनेच नशीबी होते
तरीही जगावेच आपण
असे त्याला नेहमी वाटत होते

पालवी त्याची नाजुक
ती का कोणाला सावली देणार होती?
त्याची वेड्याची मात्र
अशीच काहीशी आशा होती

आता त्याला कोणी सांगाव
जीवन तुझ एवढ्यापुरतच आहे
अन आज पालवी फुटली तरी
उद्या तुझे मरण नीश्चीतच आहे

तरीही काय ती जीद्द
त्यालाही जगुनच दाखवायचे आहे जणू
खर्च ओंडक्याचे ते आयुष्य
यालाच खरे जगणे म्ह्णु

1 comment:

Sony said...

chngali aahe kavita....