Tuesday, July 8, 2008

ती सोडून गेली म्हणुन,किती दुक्ख करणार?

ती सोडून गेली म्हणुन,
किती दुक्ख करणार?
तिच्या प्रत्येक आठवणीन्मध्ये,
किती काळ झुरणार?
येते जेव्हा नवी पहाट..
नव्या सूर्या संगत..
उजलून निघा किरनानसारखे ..
पहा फुलांची रंगत..
केलेले प्रेम नकाच विसरू..
जपून ठेवा तिच्या सगळ्या स्मृति,
राखेतून घ्या ओजस्वी भरारी..
बघा मग आकाशाची उंची किती..
खर प्रेम नाही शिकवत,
आयुष्याचा वेग थाम्बवायला,
आपल्या ख़ास व्यक्तिपायी
इतर नाती लाम्बवायला..
प्रेम देत जिद्द नवी,
तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी,
हृदयाची सगळी वादळ झेलत,
यश मिळवायला लढण्यासाठी..
गाठा अशी क्षितिजे नवी..
की तिलाही तुमचा वाटेल गर्व..
मित्रानो, आता स्वतःसाठी
सुरु करा आयुष्याचे नवे पर्व..

संपलच नव्हत काही तर..

संपलच नव्हत काही तर..
दूर का गेलो होतो?
श्वास चालू ठेवन्या साठी..
रोज का मेलो होतो?
ओल्या चिम्ब आठवणीना
शेवाल हे लागणारच ना?
मनामध्ये रुतलेली हुरहुर ..
डोळे कधीतरी सांगणारच ना?
सावरलेल एक आयुष्य..
पुन्हा का ढवालयच?
करपलेल जुन मन..
पुन्हा किती जलवायच?
रस्ता आता नेहमिचाच..
पायवाट मात्र धावत आहे..
डवरलेला एक पारिजातक..
वाट तुझीच पाहत आहे..
नकोच येउस पुन्हा वलुन ..
मी तिथे असणार नाही..
मृगजला पाठी भुललेल मन..
पुन्हा कधी फसणार नाही..