Friday, January 16, 2009

अन तोच असेल खरा, भारत मातेचा विजय !!!


भारत माता की जय
असा जयघोष कानी आला
आठवून त्या स्वातंत्र्य स्मृती,
देशाभीमान जागा झाला

प्रजासत्ताक दिवस आहे आज 
हे कैलेंडर मध्ये पाहून कळले
माझे पाय मग आपोआपच, 
त्या झेंडावंदन समारंभाकडे वळले

झेंडावंदन कार्यक्रम अटोपला
त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झाले, 
स्वातंत्र्यासाठी जीवन अर्पण केले
त्याना आठवून डोळ्यात पाणी आले

यानंतर जमलेल्या नेते मंडळींनी
सुरु केली, भाषणांची मैफील 
त्यांचे भाषण ऐकताना वाटले 
यांच्यामुळेच आहे का सारे लोक गाफील

देशावीषयीच बोलण राहील बाजुला
यानी सुरु केल आश्वासन देण,
किमान आज तरी देशाचे पाईक व्हा,
सगळ्या जनतेच मनोमन हे मागण 

भाषण झाल की संयोजक आले
अन कार्यक्रम संपल्याच घोषीत केल,
अन फ़क्त झेंडावंदन केल म्हणजे,
देशावीषयी आपल कर्तव्य का झाल ???

मग मी विचार करू लागलो
मागच्या ६०वर्षात,आपण मिळवलय काय ???
कुणाकुणाला पिझ्झाची सवय,
तर अजुनही कोणाला खायला भाकरी नाय !

पाष्चीमात्य संस्क्रृतीला आदर्श मानतो,
पण वाढत्या महागाईचा विचार, करतोय कोण ?
समोरा समोर भेटायला वेळ मीळेना,
पण कानाला तासंतास,दीसतोय CELL फ़ोन

याला प्रगती मी म्हणेल तर,
माझीच मला येइल कीव,  
स्वातंत्र्याचे मोल संभाळुन,
बलिदानांची असावी जाणीव  

जन माणसात होइल जेव्हा बंधुभाव,
अन कोणालाच नसेल उपासमारीचे भय,
तेव्हा खरया अर्थाने स्वतंत्र होऊ,
अन तोच असेल खरा, भारत मातेचा विजय !!!

Wednesday, January 14, 2009

बस झाल यार आता, किती सेंटी कविता करू?

बस झाल यार आता
किती सेंटी कविता करू?
अन त्या बावळट प्रेमापायी
एकटाच मी किती काळ झुरु??

प्रेम वगैरे काही नाही
सगळे मनाचे खेळ असतात
कितीही उत्कट इच्छा असताना
काहिंचेच तीथे मेळ बसतात

इतर प्रेमवीर मात्र उगाचच
या जंजाळात फसतात,
नयन रम्य देखावेही याना
मग रुक्ष रुक्ष भासतात

प्रेम वगैरे म्हटल की
मुलींचे नखरेच फार असतात,
प्रेमासाठी वेडे झालेले
इथे फ़क्त मुलेच दिसतात

तेव्हा मृगजलाच्या पाठीमागे धावण्यात
वेळ उगाच घालवू नका,
अन जो प्रेम देइल तुम्हाला
त्यालाच प्रेम द्यायला शिका!

Tuesday, January 13, 2009

तुला पहायची खुप इच्छा होतेय

तुला पहायची खुप इच्छा होतेय,
एकदाच मला भेटतेस का?
डोळ्यात साठवून घेऊ दे आयुष्यभ्ररासाठी
एवढच मजसाठी करतेस का?

बरच काही बोलायच आहे ,
थोडासा वेळ, देतेस का?
निरोप अखेरचा घेताना
एकदाच माझ्याकडे, पहातेस का ???

बघ एकदा प्रेमाच्या नजरेने,
माझ काही चुकल ,वाटतय का?
मैत्रीचे ते क्षण आठवता,
मनात तुझ्या दुःख, दाटतय का ?


मला सोडून मिळवलेल सुख,
तुला आता, मानवतय का?
चुकच झाली मैत्री तोडून
किमान आता तुला, जानवतय का ??

तुझी मला खुप आठवण येते म्हणत
तुझा न भेटण्याचा निश्चय, सूटतोय का?
कधी तरी माझाच म्हनवलेला आत्मा
आज तरी मजसाठी, तूटतोय का?

Friday, January 9, 2009

मन वीरहाच्या धुंदीत होत...

तू समोर होतीस तेव्हा मला,
बरच काही बोलायच होत,
शब्द त्याला शोधेपर्यंत
थोडस तू थांबायच होत

लिहायला घेतल तुझ्यासाठी
कवीतेतुन सगळ मांडायच होत
जेवढ़ होत प्रेम मनात
जणू कागदावर सांडायच होत

का माझ्याशी अशी वागलीस???
वीचारून तुला, भांडायच होत,
आपल्यात झाल ते आठवुन
मनमोकळे पणाने रडायच होत

बरच काही मनात असताना
औरच काही नशीबात होत
तुझ्याशिवाय जगण म्हणजे
दुःख माझ नीर्वीवाद होत

जेव्हा दूर चालली होतीस
तेव्हा मनात संगीत होत
थांब तुला म्हनाव तर
मन वीरहाच्या धुंदीत होत

Monday, January 5, 2009

केव्हा तरी.........

केव्हा तरी पहाटे, अचानक जाग येते
स्वप्नातल्या सत्याला, मन हे साद देते

केव्हा तरी मलाही, रम्य सकाळ आठवते,
पक्ष्यांचा कीलकीलाट मन हे दाटवते

केव्हा तरी दुपारची हळूच चाहुल लागते
लाही होता अंगाची , जणू तुझी छाया मागते

केव्हा तरी दीवसा ढवळया अंधारून येते
तुझ्या रुसव्या गीतांनी, गांगरुण जाते

केव्हा तरी दिवस मग मावळतीला कलतो
त्याला तसे पाहता जीव जणू टांगणीला लागतो

केव्हा तरी सूर्य जेव्हा मजसमोर लुप्त होतो
त्याच्या अस्तित्वाच्या शोधात, मी रात्रभर जागतो

केव्हा तरी फिरून पुन्हा तशीच पहाट येते
अन दिवसामागून दीवसाची अशीच लाट जाते

नव्या लाटांना सामोरे जाताना,डोळे मी भीजवतो
मागच्या काही लाटा पाहता, स्वतालाच डुबवतो