Tuesday, November 18, 2008

जगुन काय केल याच उत्तर बरेचदा मेल्यावरही मीळत नाही

तू दिलेली सारी वचने
तू कधीच पाळत नाही
अन याना खरच का वचने म्हणावे
हेच मला कळत नाही

अशा प्रेमाला म्हनाव काय
जिथे नातच कधी जुळत नाही
तुझ्या माझ्या नात्याच उत्तर
मला कधीच मिळत नाही

मेल्यावर काय होत
हे मेल्याशीवाय कळत नाही
पण जगुन काय केल याच उत्तर
बरेचदा मेल्यावरही मीळत नाही

Friday, November 7, 2008

होऊ दे आठवणीही माझ्या धूसर

मित्रांच्या गराड्यात असुनही
जेव्हा मी एकटा पडतो ,
तुझ्या आठवणीत जीव माझा
कठोर वेदनेने तड्फडतो

वेदनाही अशा ज्याला
कसल्याच वेदनेची तोड नाही
तुझ्या सोबतच्या क्षणांना
कुठल्याच सुखाची जोड़ नाही

तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण
मी प्राणपणाने जपला आहे
तू कशीही वागलीस माझ्याशी तरीही
याच क्षणांणमध्ये माझा आत्मा गुंतला आहे

तुला जसे जमेल तसे नाते तू जप
नाहीच जमले तर सगलच विसर
जिथे तुला ओढच ना राहीली माझी
तिथे होऊ दे आठवणीही माझ्या धूसर