Friday, November 7, 2008

होऊ दे आठवणीही माझ्या धूसर

मित्रांच्या गराड्यात असुनही
जेव्हा मी एकटा पडतो ,
तुझ्या आठवणीत जीव माझा
कठोर वेदनेने तड्फडतो

वेदनाही अशा ज्याला
कसल्याच वेदनेची तोड नाही
तुझ्या सोबतच्या क्षणांना
कुठल्याच सुखाची जोड़ नाही

तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण
मी प्राणपणाने जपला आहे
तू कशीही वागलीस माझ्याशी तरीही
याच क्षणांणमध्ये माझा आत्मा गुंतला आहे

तुला जसे जमेल तसे नाते तू जप
नाहीच जमले तर सगलच विसर
जिथे तुला ओढच ना राहीली माझी
तिथे होऊ दे आठवणीही माझ्या धूसर

2 comments:

आशा जोगळेकर said...

छान ! कुठे कुठे टायपिंग च्या चुका आहेत.सगळं सगलं नाही अन् क्षणांमध्ये क्षणाण मध्ये नको . पण कविता सुरेख आहे तर प्रेझेंटेशन ही सरेखच हवं ना ?

आशा जोगळेकर said...

सुरेख