Monday, March 15, 2010

मी शिंपुनी माझ्या रुधिरा

जागवील्या त्या आठवणी
केली स्वनात पाठवणी
ठरलो अवीजयी शूरा
मी शिंपून माझ्या रुधिरा

कठोर तू वागलीस
शब्दांस न जागलीस,
जीवनाचा केला पाणउतारा
मी शिंपुनी माझ्या रुधिरा

सारे बोलणे सोडलेस...
मैत्रीचेही नाते तोडलेस
जगलो परी वीधुरा
मी शिंपुनी माझ्या रुधिरा

थेंब थेंब मी वेचले,
सारे येथेच साचले,
हतबल जाहलो पुरा
मी शिंपुनी माझ्या रुधिरा

एकटाच मी जगतो
हृदयास त्या शोधतो
करी जे आठवणीचा चुरा
मी शिंपुनी माझ्या रुधिरा

~सचिन

Wednesday, February 3, 2010

कविता कित्येक लिहिल्या, तुला न त्या कळल्या कधी!

कविता कित्येक लिहिल्या, तुला न त्या कळल्या कधी
नकळत प्रेमात पडलो तुझ्या, ही एक मज व्याधी,

लिहितो ते भावूक होत,कवितांची हीच खुबी
शब्द एकी मांडता, दिसे फक्त तुझीच छबी

पण तू आहेस कुठे, मन मनास प्रश्न पाडे,
उत्तर कधी जाणण्या, मी त्यास स्वप्नदुनयी धाडे
कुणी मज सांगे मग, मला कुणी आपल्याची उणीव,
तुझ्या जागी तूच सखे, ही मज नेहमी जाणीव,
कधी दिसतेस तू कुणात, हळुवार माझ्याशी बोलताना
भ्रम माझा तुटे मग, ती भावनांशी खेळताना,

प्रेम साऱ्यांना देन, हाही गुन्हा ठरतो आहे,
अन प्रत्येक कठोर शब्दान, हजारदा मरतो आहे,

कोणाला नकोय ग आता, स्वताहून दिलेली माया,
आपलेपणान बोलल की, आता वेळ जातोय वाया

मीही कित्येकदा ठरवतो, आता एकदम कठोर वागायचं,
समाज जसा जगतोय ना, अगदी तसच जगायाच ,

पण तुष्ट्पणाने वागण मला कस ग जमणार
हजारदा दुखावलो तरी, प्रेम ज्योत कशी शमणार?

-- सचिन
!