Friday, July 6, 2018

अर्धायुष्य

पाहता पाहता झपकन
अर्ध(?) आयुष्य सरल
थोडं थांबलो, मागे वळून पाहिलं
आठवणीत  काय उरल

नागमोडी वळणांच्या या प्रवासात
कित्येक चेहरे भेटले,
काही आले सोबतीला 
काही मात्र नकळत हरवले

गावे आधी दूर  होती
तेव्हा प्रवासही अनुभवला
अंतर आता झाले कमी 
पण प्रवास तो हिरावला

DJ च्या गाण्यावर थिरकणारे पाय
आता काहीसे स्थिरावले
गझलमध्ये गुंग होऊन
जाणवते काही गमावले

काय बरोबर काय चूक
व्याख्या या बदलत गेल्या
अनुभव काही असे आले कि
पार्ट्या आता ओल्या झाल्या

बालकाचा पालक झालो
तेव्हा बाबा होणे कळले
"Lets Do It" म्हणणारे आयुष्य
थोड्या स्थिरतेकडे वळले

पैसे खूप जमवताना
दिवस खूप गमावले
आनंदाचे अंकगणित मात्र
विना पैशानेच शिकवले

बरच काही घडलय
खूप काही घडायचंय
आठवणींच्या या शिदोरीत
मला आयुष्य हे जगायचंय












~ सचिन