Tuesday, September 25, 2007

माझी पहीली कवीता

सांगन्यासारख पुष्कल आहे
बोलन्यासारख पुष्कल आहे
पण तुझ्यामाझ्या भेटीतला
दुरावाही अटल आहे

सांग स्वताला आवरू कसा
पान्यात नाव सावरू कसा
सागराच्याच पोटी जर
थैमान घालीत वादल आहे

तुच सांग काय करु
चीत्रात रंग कसे भरू
प्रत्येकच रंगाला जर
स्मर्नांचा ओघल आहे

कसे सांगतेस थांब जरा
पोर्नीमा अजुन लांब आहे
चंद्राकडे जान्याचे पायात
कुठे बल आहे

आता आपण अस करु
आता आपण अस वागु
आणी सार्या जगाला
आता सांगु....

दीवा आणी वातीच नात
कीती नीर्मल आहे
अन तुझ्यामाझ्या भेटीनेच
सुर्य पहा उजल आहे
सुर्य पहा उजल आहे ...............

Thursday, September 20, 2007

ख़ास तुझ्यासाठी......

चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...

अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं

कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही

तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं

जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं

जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...

थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

का मला तुझी आठवण येते????

मलाच काळात नाही का मला तुझी आठवण येते
जेथून पळातोय परत तिथेच का मला घेऊन जाते.

आता खरच मी का तुला दोष द्यावा
आता तुला तरी का पश्चाताप व्हावा.

तुझ्यासारखच तुझ्या आठवणिना सोडून पुढे जायचाय
कधीतरी मलाही तुझ्या आधी पहिल यायचाय

पण कधीतरी मला तू नक्की सांग अशी का वागलिस
एकदा तरी प्रेमाला का नाही तू जागलिस

मला माहीत होत तू नाही करणार माझी प्रतीक्षा
सवय मला तूच लावली नाही ठेवायच्या कोणाकडून अपेक्षा.....

तुला माझी म्हणण्याची सवय अजूनही आहे

बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे......

बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे......

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे......

माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे...
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे......

आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे......

एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे......


नाकारलंस तु मला नेहमी
ना जाणल्यास भावना कधी
समजतील तुला त्या कधीतरी
होशील तु माझी तेव्हा तरी
अशीच मनाची समजूत काढण्याची
सवय अजूनही आहे......

का अशी बदललीस तु ?
का माझ्यासाठी परकी झालीस तु ?
खरंच का मला विसरलीस तु ?
मी आता तुझा कुणीही नसलो
तरी तुला माझी म्हणण्याची
सवय अजूनही आहे...अजूनही आहे!!!