Thursday, September 20, 2007

तुला माझी म्हणण्याची सवय अजूनही आहे

बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे......

बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे......

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे......

माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे...
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे......

आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे......

एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे......


नाकारलंस तु मला नेहमी
ना जाणल्यास भावना कधी
समजतील तुला त्या कधीतरी
होशील तु माझी तेव्हा तरी
अशीच मनाची समजूत काढण्याची
सवय अजूनही आहे......

का अशी बदललीस तु ?
का माझ्यासाठी परकी झालीस तु ?
खरंच का मला विसरलीस तु ?
मी आता तुझा कुणीही नसलो
तरी तुला माझी म्हणण्याची
सवय अजूनही आहे...अजूनही आहे!!!

3 comments:

Santosh said...

hey...
Ek number aahe kavita...

tula anek shubhechha...

Prakash said...

Sahi aahe re sachya
ashach kavita karat raha ..!!

Asha said...

Kavita aavadlya. Good goeing, but

i think u r alone......

in ur poeams.