Wednesday, June 26, 2013

शाळेतले दिवस...

गेले ते दिवस, जेव्हा शाळेत आपण जात होतो
बालपणीच्या धुंदीत, प्रत्येक क्षण जगत होतो

शाळेत येन्या जाण्यासाठी School बस असायची
तासाभराच्या प्रवासात, धमाल मस्ती चालायची

प्रत्येकजण इथे आपल स्वताच विश्व रंगवायचा
कधी गाड्यांची Race तर कधी खेळ गाण्यांचा चालायचा

प्रार्थना हॉल मध्ये, शाळेचा दिवस सुरु व्हायचा
पसायदानाचा आवाज साऱ्या शाळेत घुमायचा

मधली सुट्टी झाली कि डब्बा खायची एकच घाई
उरलेला वेळ मग कधी Cricket कधी King-Kong मध्ये जाई

एकमेकांचा डब्बा खायचा ,संकोच कसलाच नव्हता
अभ्यास कला क्रीडा मध्ये, आलेख नेहमी धावता

पुष्कळ होते मित्र, त्यांना पुष्कळ टोपण नावे असायची
कोणी लाजाळू तर कोणाची Setting ची तयारी चालायची

कुंभाराने घडवाव मातीला, तसं आपण शाळेतच घडलो
शाळेतल्या त्या आठवणीनी, त्या दिवसांच्या प्रेमात पडलो

जरी कित्येक काळ लोटला, तरी आठवणी नेहमी येतात
शाळेचे दिवस जगल्याचे , समाधान नेहमी देतात

आपली शाळा, आपले मित्र आणि आपला वर्ग
खरच त्या दिवसांमध्ये अनुभवला आपण स्वर्ग
~ सचीन