Tuesday, August 5, 2008

तुझ्याच प्रेमसागरात एकरूप होऊदे मला...

सौंंदर्य सखे तुझ
मला नेहमीच आवडत
साधेपणातही सुंदर दीसन
हे अस कस घडत ??

पायातले पैंजण तुझ्या
सुरैल तालावर नाचतात..
माझ्या पावलांना मग
त्याचे गुज ऎकू येतात ...

गालावरची खळी तुझ्या
कोड्यातच टाकते मला...
जस अलगद उमलणन तुझं
ं माझ्या नाजूक फुला

काळेभोर केस तुझे
त्याना उपमा मी कशाची देऊ
तुझ्या मनाचेच प्रतीबीम्ब जसे
सरळ, शालीन अन मऊ

चेहरयावरी उडती तुषार ..
तव अंग चोरूनी घेतेस ..
वर्षाविहारात मात्र ..
चिंब ओली होऊन भिजतेस ...

रागवनं तुला अजिबात जमत नाही.
स्वार्थाला तर कुठे थाराच देत नाही..
सदा मदतीसाठी हात सरसावतेस..
दुबळ्यांना आधार एवढेच परम मानतेस..

ओठ पहाता सखे तुझे
बेधुंद मन माझे होते
तुझे माझे अनेक जन्माचे
व्हावे असे नाते

तु लाजताना मात्र
फक्त तुझ्याकडे बघणं होतं
तुझं ते मोहकं रुप पाहून
फक्त तुलाचं बघण्याच वेड लागतं..

एवढं सारं आहे तुझ्याकडे..
तरीही तुझे नयन काय शोधतात..
तुझ्याच प्रेमात पडलोय मी
असे सारे शब्द माझे मलाच ऐकू येतात..

आज मी तुला आवर्जून
माझ्या अंतकरणातला सांगत आहे..
माझ्या प्रेमाचं निवेदन
गुडघे टेकवून मांडत आहे..

आता तरी होकार दे ,
आणि काय हवयं मला?
येऊदेत प्रेमाची लाट..
अन तुझ्याच प्रेमसागरात एकरूप होऊदे मला...