Friday, January 16, 2009

अन तोच असेल खरा, भारत मातेचा विजय !!!


भारत माता की जय
असा जयघोष कानी आला
आठवून त्या स्वातंत्र्य स्मृती,
देशाभीमान जागा झाला

प्रजासत्ताक दिवस आहे आज 
हे कैलेंडर मध्ये पाहून कळले
माझे पाय मग आपोआपच, 
त्या झेंडावंदन समारंभाकडे वळले

झेंडावंदन कार्यक्रम अटोपला
त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झाले, 
स्वातंत्र्यासाठी जीवन अर्पण केले
त्याना आठवून डोळ्यात पाणी आले

यानंतर जमलेल्या नेते मंडळींनी
सुरु केली, भाषणांची मैफील 
त्यांचे भाषण ऐकताना वाटले 
यांच्यामुळेच आहे का सारे लोक गाफील

देशावीषयीच बोलण राहील बाजुला
यानी सुरु केल आश्वासन देण,
किमान आज तरी देशाचे पाईक व्हा,
सगळ्या जनतेच मनोमन हे मागण 

भाषण झाल की संयोजक आले
अन कार्यक्रम संपल्याच घोषीत केल,
अन फ़क्त झेंडावंदन केल म्हणजे,
देशावीषयी आपल कर्तव्य का झाल ???

मग मी विचार करू लागलो
मागच्या ६०वर्षात,आपण मिळवलय काय ???
कुणाकुणाला पिझ्झाची सवय,
तर अजुनही कोणाला खायला भाकरी नाय !

पाष्चीमात्य संस्क्रृतीला आदर्श मानतो,
पण वाढत्या महागाईचा विचार, करतोय कोण ?
समोरा समोर भेटायला वेळ मीळेना,
पण कानाला तासंतास,दीसतोय CELL फ़ोन

याला प्रगती मी म्हणेल तर,
माझीच मला येइल कीव,  
स्वातंत्र्याचे मोल संभाळुन,
बलिदानांची असावी जाणीव  

जन माणसात होइल जेव्हा बंधुभाव,
अन कोणालाच नसेल उपासमारीचे भय,
तेव्हा खरया अर्थाने स्वतंत्र होऊ,
अन तोच असेल खरा, भारत मातेचा विजय !!!

1 comment:

Anonymous said...

really its fact
barach workout remain ahe ajun
progress sathi