Tuesday, July 8, 2008

संपलच नव्हत काही तर..

संपलच नव्हत काही तर..
दूर का गेलो होतो?
श्वास चालू ठेवन्या साठी..
रोज का मेलो होतो?
ओल्या चिम्ब आठवणीना
शेवाल हे लागणारच ना?
मनामध्ये रुतलेली हुरहुर ..
डोळे कधीतरी सांगणारच ना?
सावरलेल एक आयुष्य..
पुन्हा का ढवालयच?
करपलेल जुन मन..
पुन्हा किती जलवायच?
रस्ता आता नेहमिचाच..
पायवाट मात्र धावत आहे..
डवरलेला एक पारिजातक..
वाट तुझीच पाहत आहे..
नकोच येउस पुन्हा वलुन ..
मी तिथे असणार नाही..
मृगजला पाठी भुललेल मन..
पुन्हा कधी फसणार नाही..

No comments: