Thursday, June 5, 2008

मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

का मी तुला देवाकडे पुन्हा मागतो आहे ?
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

मलाही कळतय आता
तुला नकोसा झालाय माझा सहवास
अन मला एकट सोडून
तू सुरु केलाय जीवनाचा प्रवास
या प्रवासात तुझ्यासंगे येण्याचे मीही स्वप्न पहातो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

खुप वीश्वास होता तुझ्यावर
अन तेवढेच प्रेमही केले
तू मात्र काहीच वीचार न करता
मला तुजपासुन दूर केले
तुझ्या परतण्याची वाट , मी अजूनही बघतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

आता कस सांगू तुला
हे प्रेम म्हणजे काय असत
यात वीरहाचे दुःख पचवण
वाटत तेवढ सोप नसत
प्रत्येक श्वासागणीक मी अधीकाधीक प्रेम करतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

तुझा तो नकार ऐकुन
रस्त्याकाठचा दीवाही बंद झाला
तू गेल्यानंतर मला तो बोलला
तुझ्या शब्दांचा स्पर्श त्याच्याही ह्रुद्यास झाला
प्रत्येक क्षण जगताना, अजूनही मी तीळतीळ मरतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?

No comments: