Tuesday, September 8, 2009

जिच्यात तू नेहमी तीलाच शोधल आहे ...

खुप दिवस झाले त्याला
पहिल्यांदा गाडी चालवत होतो
आनंद खुप झाला होता
म्हणुन वेगानेच वळवत होतो

मग काय.. पडलो जोरात,
जखम झाली अंगाला,
खुप दुखायला लागले,
कोणीच येइना मदतीला

एकटाच बसलो काही वेळ
तशीच जखम दाबुन धरली,
वेदना फार होत होती,
काही वेळाने ती विरली

वाटू लागले मनाला,
आता जखम बरी झाली
उठलो जसा चालायला,
डोळ्याशी अंधारी आली

दीवसामागुन दीवस गेले
जखम मात्र सलत राहीली
जड़ झाले अंग सारे,
नजर अश्रु गाळत राहीली

दरवेळी जखमेवर एक
नवीन खपली यायची,
जखम माझी बरी होइल,
आशा मनी निर्माण व्हायची
...
खपली नेहमी मग मी,
मनापासून जपायचो,
माझ्यासाठी तीच अस्तित्व,
मनोमन तिचे आभार मानायचो

जास्तच काळजी घेतली ना की,
खपलीही मग निघून जायची,
तिची घेतलेली अती काळजी
तीला नाहक दखल वाटायची

पुन्हा एकदा जखम नव्याने
पूर्वीसारखी ताजी व्हायची,
पुन्हा एकदा त्रास नव्याने
मला वाढवून द्यायची..

देवाकडे पाहील अन विचारल
देवा, जखम का रे बरी होइना,
बघ ही अवस्था माझी,
धड चालताही येईना

देव म्हणाला, जखम ही तीच रे
जीने तुला कधीच सोडल आहे,
अन खपली ती नवी मैत्रीण,
जिच्यात तू नेहमी तीलाच शोधल आहे