Friday, December 21, 2007

त्यातही तुला मीच दीसेल,

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशीलही
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशीलही
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

कधी जर वाटले एकटे तुला
तू थोडीशी उदास होशीलही
मध्येच हसशील आठवून
प्रसंग आयुश्यताला कसलातरी ,
नीट बघ त्याप्रसंगाकडेे , त्यातही मीच असेल

बोलता बोलता तू सहजच
"वीसरले मी सचीनला " म्हणशीलही,
पण तेव्हा आरशासमोर उभी रहा
तुझ्या चेहरयावरचे भाव वाच जरा
नीट बघ त्याचेहर्याकडे, त्यातही तुला मीच दीसेल,त्यातही तुला मीच दीसेल .........