Sunday, December 16, 2007

यातच माझ आता भाग्य आहे !!!

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
मीही खूप आनंदी होतो इतरांप्रमाणे
जेव्हा त्या क्षणां समवेत होतो

नव्हते कुणाची पर्वा मलाही
नव्हते कोणतीही सीमा मलाही
नव्हते कुणाची भीती मलाही
जेव्हा तिच्या समवेत असायचो मी

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
होता तोच चंद्र आम्ही असल्याची साक्ष देणारा
दूर असतांना निरोप आमचे घेऊन येणारा

बिझी असायचा फोन आमचाही
जेव्हा एकमेकांशी तासंतास गप्पा मारायचो आम्हीही
स्वप्नांच्या सुंदर विश्वात हजेरी असायची आमचीही
जेव्हा एकमेकांच्या विचारात असाच डुबायचो आम्हीही

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
खूप काही ठरवायचो एकटे असल्यावर
मात्र गप्पच बसायचो एकमेकांसमोर आल्यावर

कळत होते सर्व तिलाही
पण मीही उगच चेष्टा करायचो
मीच नेहमी बोलावं अस ती हट्ट धरायची
पण त्यावेळी मी मात्र शांत बसायचो

आता जेव्हा वीचार करतो एकटा,
तेव्हा वाटत मी ही चुकयाचो तीच्याशी वागताना ,
पण एकट्याला मला सोडून गेली ती ,
हे ही माझ्या मनाला लागतना 

तीला वीसरण जमत नाही मला ,
खरच, तीची खुप आठवण येते,
कारण तीच्यासोबतचे क्षण हे माझ्या आयुष्याचे
न वीसरनारे असे क्षण होते !

 बस , तीला एकदा भेटायाच आहे मला
अन मनातल सगळ बोलायच आहे ,
खर्च चुकलोच मी तेव्हा ,
हे तीलाही आता सांगायच आहे 

आता असे वाटते
फक्त एकदा तिने समोर यावे
समोर येऊन माझ्याकडे
एकदाप्रेमवेड्या त्या नजरेने बघावे

सांगेल सर्व तिलाही
पण आता तेही शक्य नाही
माझ्या एका हाकाने येईल
इतकी जवळ आता तीही नाही

कारण आता तीलाही कदाचीत
मी पूर्ण परका झालो असेल,
अन कोण हा ------???
असा प्रश्नही तीला पडत असेल

जाउदे,
तीला भले मी आठवतही नसेल
पण ती मात्र नेहमी मला प्रीय आहे ,
तीला हव असलेल सर्व तीला मीळाव,
यातच माझ आता भाग्य आहे
यातच माझ आता भाग्य आहे !!!

2 comments:

राजकुमार पाटील said...

Kakaas, Really mala far awadali hi poem. U R GREAT MY DEAR.

SACHIN PATHADE said...

Thanks dear!!!